वार्ताहर/सडोली खालसा
कोरोना
संसर्गाबाबतची खबरदारी म्हणून
सडोली खालसा (ता.
करवीर) येथील
एकाला बुधवारी कोल्हापूरातील
सीपीआर रुग्णालयात दाखल
करण्यात आले. मात्र
या कोरोना संशयित रुग्णामुळे
सडोली परिसरात एकच खळबळ उडाली
असून लोकांमध्ये भीतीचे
वातावरण पसरले.
सडोली
खालसा ता. करवीर
येथील 22 वर्षीय युवक
नोकरीनिमित्त फलटण येथे होता.
हा तरूण 24 मार्च
रोजी फलटन येथून गावी आला
होता. त्यावेळी
त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र
यांच्या देखरेखीखाली होम
क्वारंटाईन केले होते. गेली
दोन दिवस त्याला सर्दी,
खोकला ताप असा त्रास
सुरू झाल्याने गावात खासगी
डॉक्टरकडे त्यांने उपचार
घेतले होते. परंतु
त्याच्या प्रकृतीत सुधारणा
होत नसल्याने खासगी डॉक्टरने
ही बाब दक्षता समितीच्या
कानावर घातली. दक्षता
समितीने तात्काळ प्राथमिक
आरोग्य केंद्राला याची माहिती
दिली व त्याची तपासणी केली
तपासणी केली. व पुढील
उपचारासाठी त्याला सीपीआरमध्ये
दाखल करण्यात आले.