अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांची माहिती, नर्सिंग असोशिएशनचे आंदोलन स्थगिती, आज प्रलंबित मागण्यांवर चर्चा
प्रतिनिधी / कोल्हापूर
सीपीआर हॉस्पिटलमधील परिचारिकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, या मागणीसाठी गव्हर्न्मेंट नर्सेस असोसिएशनने मंगळवारी सीपीआरमधील साखळी उपोषण स्थगित केले. दरम्यान, प्रलंबित मागण्यांपैकी 20 नर्सिंग स्टाफ सप्ताहभरात दिला जाईल, अशी ग्वाही राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी दिली. तसेच अन्य मागण्यांवर बुधवारी, गुरूवारी चर्चा केली जाईल, असेही स्पष्ट केल्याची माहिती असोसिएशनच्या पदाधिकाऱयांनी दिली.
सीपीआर कोरोनासाठी आयसोलेटेड आहे. येथे परीचारीकांची 360 पदे तातडीने भरावीत, यासाठी गव्हर्न्मेंट नर्सेस असोशिएशनने मंगळवारी निदर्शने, साखळी उपोषणाचा इशारा दिला होता. पण संचारबंदी, लॉकडाऊनमुळे असोसिएशनने आंदोलन स्थगित केले. दरम्यान, मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्याशी असोसिएशनच्या पदाधिकाऱयांनी चर्चा केली. चर्चेत सीपीआरमधील सर्व रिक्त पदे तातडीने भरा, मानांकनानुसार 360 पदे भरा, पिंवा कंत्राटी 400 पदे भरा, परिचारिकांना एन 95 मास्क, ब्रिथेबल पीपीई कीट तातडीने मिळावे, राहण्याची व्यवस्था असावी आदी मागण्यांवर चर्चा झाली. अधिष्ठाता डॉ. मोरे यांनी सप्ताहभरात 20 नर्सिंग स्टाफ तातडीने दिला जाईल, अशी ग्वाही दिली. अन्य मागण्यांसंदर्भात बुधवारी चर्चा करण्याची तयारी दर्शवली, अशी माहिती असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षा हाशमत हावेरी, संदीप नलवडे, संजीवनी दळवी, मनोज चव्हाण, कैश कागदी, पुष्पा शिंदे यांनी दिली.