५ लाखाचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी / कागल
कागल पोलीसांनी तालुक्यातील दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. या चोरटयांनी कागल, हुपरी, इस्पूर्ली आणि राधानगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ चोरीचे गुन्हे कल्याचे कबूल केले आहेत. पोलीसांनी त्यांच्याकडून ८५ ग्रॅम सोन्याचे दागिने, सहा पाण्याच्या विद्युत मोटरी आणि दोन मोटरसायकल असा ५ लाख २ हजार ५७० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत कोला आहे. गेल्या महिनाभरात कागल पोलीसांनी चांगली कामगिरी करत दुसरा गुन्हा उघडकीस आणला आहे .
कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेन स्नेचिंग घरफोडया दुचाकी मोटरसायकल चोरी आणि पाण्याच्या विद्युत मोटरी चोरीस जाण्याच्या घटना वाढल्या होत्या. या घटनांचा तपास लावण्यात पोलीसांना यश मिळत नव्हते. त्यामुळे कागल पोलीसांची चिंता वाढली होती. दरम्यानच्या काळात वंदूर येथील सराईत गुन्हेगाराने आपल्याला मारहाण झाल्याची तक्रार कागल पोलीस ठाण्यात दिली होती. ही मारहाण चोरीच्या मालाच्या वाटणीवरून झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले होते. मात्र, पोलीस पुराव्याच्या अभावामुळे चोरटयापर्यंत पोहचू शकत नव्हते. त्यामुळे मारहाणीतील प्रकरणातील संशयितावर लक्ष केंद्रीत करून पोलीसांनी तपास केला. तसेच त्यांच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा करून कागल तालुक्यातील पिंपळगांव खुर्द येथील निखिल प्रकाश सातवेकर (वय २६) आणि लिंगनूर दुमाला येथील अक्षय ऊर्फ बबलू पसारे (वय२४) यांना चौकशी करिता ताब्यात घेतले. या संशयीतांनी कागल, हुपरी, इस्पूर्ली आणि राधानगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, घरफोड्या, चेन स्नेचिंग, दुचाकी वाहन चोरी आणि पाण्याच्या विद्युत मोटारींची चोरी केल्याचे कबूल केले, अशी माहिती कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाके यांनी दिली.
या चोरटयांनी चारही पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ गुन्हे केल्याचे कबूल केले आहेत. त्यांच्याकडून सुमारे ५ लाख २ हजार ५७० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . यामध्ये सोन्याचे मगळसूत्र, चेन, अंगठया आणि कानातील फुलांचा समावेश आहे. तसेच दोन मोटरसयकली आणि सहा विद्युत मोटारीही जप्त केल्याचे पोलीस निरीक्षक नाळे यांनी सांगितलं.
सीमाधासह कर्नाटक, सांगली आणि कराड तालुक्यात या चोरटयांचा वावर होता. याठिकाणीही त्यांनी चोरीचे गुन्हे केल्याची शक्यता नाळे यांनी व्यक्त केली. या चोरटयांनी सोन्याच्या दागिन्यासाठी वयोवृद्ध महिलांना लक्ष केले होते. या महिला खरे सोन्याचे दागिने वापरतात. तसेच गुन्हा उघडकीस येण्याचे प्रमाणही कमी असल्याने त्यांनी या महिलांना लक्ष केल्याचे नाळे यांनी सांगितले. या प्रकरणांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रितकुमार पुजारी, निखिल कर्चे हे करत आहेत.