प्रतिनिधी / बेळगाव
आयएमए, महानगरपालिका व रेडक्रॉस संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नाने व0ढाsल्हापूर सर्कल येथे सुरू झालेल्या ऑक्सिजन बँकेमध्ये 5 नवीन बेड्सची सुविधा करण्यात आली आहे. खासदार मंगला अंगडी यांच्या उपस्थितीत ते जनसेवेत रुजू करण्यात आले.
यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी ऑक्सिजनची तीव्र कमतरता असल्याने ऑक्सिजन सेंटर सुरू करण्यात आले असून ही सेवा पूर्णतः विनामूल्य देण्यात येत आहे, असे सांगितले. खासदार अंगडी यांनी या सेवेबद्दल तिन्हीही संस्थांची प्रशंसा केली. यावेळी डॉ. अनिल पाटील आणि डॉ. देवगौडा यांनी विविध स्वयंसेवी संस्थांनी या बँकेला कशा पद्धतीने मदत केली आहे याची माहिती दिली. पाणी आणि अन्न सहकार्याबद्दल दीपा कुडची यांनाही धन्यवाद दिले.