गोकुळ, जिल्हा बँकेसह जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील 1002 संस्थांच्या निवडणुका स्थगित
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्याच्या राजकिय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या गोकुळ, जिल्हा बँक, राजाराम कारखान्यासह राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना सहाव्यांदा ब्रेक लागला ज्या टप्प्यावर पुढे निवडणुका 31 मार्च पर्यंत स्थगित कराव्यात असे आदेश सहकार विभागाने बुधवारी काढले. याचा जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात होत असलेल्या 1002 संस्थावर परिणाम झाला आहे. निवडणुकीच्या या खेळखंडोबामुळे सहकार क्षेत्रात घोर निराशा पसरली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर 3 फेब्रुवारीपासून निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. त्यामुळे उत्कंठता लागून राहिलेल्या जिल्ह्यातील गोकुळ, जिल्हा बँक, राजारामसह बाजर समिती, साखर कारखाने, कोजिमाशि, प्राथमिक शिक्षक, गर्व्हमेंट सर्व्हंट बँक, जिल्हा परिषद सोसायटीसह चार हजार संस्थांच्या निवडणुकीतील अडथळा दूर झाला होता. मात्र बुधवारी आलेल्या सुधारीत आदेशाने पुन्हा निराषा झाली.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीसाठी पहिल्यांदा सहकारी संस्थांच्या निवडणुका 27 जानेवारी 2020 ला तीन महिन्यांसाठी पुढे ढकलल्या. त्यानंतर कोरोना महामारीमुळे निवडणुका स्थगितीचा निर्णय झाला. यावेळी काही संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली होती. मात्र आहे त्या टप्प्यावर स्थगिती दिली होती. त्यानंतर कोरोनाचे रुग्ण वाढल्याने तब्बल चारवेळ तीन-तीन महिन्यांसाठी कार्यकाल वाढविला. 16 जानेवारीला शेवटची मुदतवाढ होती. 31 मार्चपर्यंत निवडणुका लांबणडवर टाकण्यात आल्या.
दरम्यानच्या काळात विधान परिषद, ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. मल्टीस्टेट बँका, साखर कारखाने आदींच्याही निवडणुका पार पडल्या, हाच मुद्दा घेऊन राज्यातील काही सहकारी संस्थांनी न्यायालयात धाव घेतली होती. कोल्हापुरातील राजाराम कारखान्यानेही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तर गोकुळ बचाव समितीनेही गोकुळची निवडणूक लवकर घेण्यात यावी, अशी मागणी केली होती.
गोकुळ प्रारुप यादी थांबली
गोकुळसाठी ठराव दाखल करुन अंतिम यादी प्रसिद्ध झाली होती. 3659 पैकी 3654 ठराव निवडणूक विभागाकडे दाखल झाले. निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्याने हरकती मागवल्या होता.बुधवार 24 अंतिम दिवशी 70 हरकती दाखल झाल्या आहेत. याहरकतीसह 35 दुबार ठरावावर 8 मार्च ला निर्णय होणार होता. आता 31 मार्च नंतर यावर निर्णय होणार आहे.
बँक्स करणे
आतापर्यत मुदतवाढ
1- 27 मार्च 2020
2-18 मार्च 2020
3- 17 जून 2020
4-24 सप्टेंबर 2020
5- 16 जानेवारी 2021
6- 2 फेब्रुवारी स्थगिती उठवली
7-24 फेब्रुवारली 31 मार्चपर्यंत स्थगिती