प्रतिनिधी / पेठ वडगाव
हातकणंगले मतदारसंघ हा सांगली जिल्हा हद्दीला लागून असल्याने हातकणंगले मतदार संघात सांगली जिल्ह्यात व सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात नोकरीस असणार्या युवकांची संख्या मोठी आहे. तसेच शासकीय, निमशासकीय, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बँक कर्मचारी,खाजगी नोकरदार यांचीही संख्या जास्त आहे. सांगली जिल्ह्यात दवाखान्यात उपचार घेत असलेले रुग्णही आहेत. या रुग्णांची तसेच कर्मचारी वर्गाची कोरोनामुळे असलेल्या जिल्हाबंdidदीमुळे प्रचंड गैरसोय होत आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांना नोकरी व इतर कामासाठी सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात ये-जा करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूबाबा आवळे यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचेकडे निवेदनाद्वारे केली.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी राज्यात जिल्हा बंदी घालण्यात आली आहे. आपल्या जिल्ह्यातून परजिल्ह्यात जाण्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागते. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघ हा सांगली जिल्हा हद्दीला लागून असल्यामुळे हातकणंगले मतदार संघात शिरोली एम.आय.डी.सी. लक्ष्मी ओद्योगिक वसाहत व अन्य जिल्ह्यातील कामगार वर्ग तसेच शासकीय कार्यालयातील नोकरदार, प्राथमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शेतकरी वर्ग शेतमजूर, व्यापारी तसेच उपचारासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात येणारे—जाणारे रुग्णही आहेत.या सर्वांची लॉकडाऊन काळात करण्यात आलेल्या जिल्हाबंदीमुळे मोठी गैरसोय होत आहे. या सर्व लोकांची गैरसोय होत असल्याने सांगली जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिलेली आहे. याच धर्तीवर नोकरदार, कामगार व इतर लोकांना आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात येण्या-जाण्यासाठी परवानगी देवून लोकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे आमदार राजूबाबा आवळे यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचेकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी वडगाव बाजार समिती संचालक रमेश पाटोळे, रामभाऊ लोकरे, सचिन चव्हाण, संजय काशीद आदी उपस्थित होते.