“आम्ही आमच्या लढाईवर ठाम”
प्रतिनिधी / शिरोळ :
जिल्ह्याचे पालकमंत्री गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी साखर कारखान्याने अडचणीत असल्याने अंकुशच्या कार्यकत्यांकडे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.
आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुगे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली बैठकीत सकारात्मक चर्चा पार पडली. सध्या साखर कारखाने अडचणीत असल्यामुळे व्याजाच्या लढाईच्या आंदोलनाबाबत विचार करण्याची विनंती केली. परंतू आम्ही आमच्या लढाईवर ठाम असल्याचे आंदोलन अंकुशचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना कारखान्यांना नोटीसा काढायला लावाव्यात अशी विनंती केली तसेच ना. सतेज पाटील यांच्याबरोबर येत्या हंगामाच्या ऊस दराच्या बाबतीत तपशीलवार चर्चा झाली. यावेळी पीक कर्ज घेताना ऊस नोंदीचा दाखला शेतकऱ्यांकडून न घेण्याची विनंती केली. तहसीलदार कारखान्यांना नोटीस काढत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे.
उद्या सोमवारी शेतकऱ्यांनी आंदोलनात भाग घेण्यासाठी शिरोळ तहसीलदार कार्यालयात जमावे असे आवाहन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुगे यांनी केले आहे. पालकमंत्री यांच्या बरोबर झालेल्या चर्चेत प्रभाकर बंडगर भूषण गंगावणे दिपक पाटील कृष्णा गावडे संजीव गायकवाड योगेश जाधव आदी उपस्थित होते.