तब्बल 19 महिन्यांनी होणार प्रारंभः नोकरदारांबरोबर विद्यार्थी व इतर प्रवाशांना लाभ
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनामुळे गेली 19 महिने बंद असलेली कोल्हापूर-सातारा पॅसेंजर रेल्वे येत्या मंगळवारपासून (16 नोव्हेंबर) पुन्हा सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात आठ डब्यांची डेमो रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे. प्रारंभी या पॅसेंजरची एकच फेरी होणार असून नजीकच्या काळात फेऱया वाढविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱयांनी दिली. दरम्यान, प्रवासी वर्गातून कोल्हापूर-सातारा पॅसेंजर सुरू करण्याच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून इतर बंद असलेल्या पाच पॅसेंजरही सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कोल्हापूर-सातारा पॅसेंजरला नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आला आहे. नोकरदार, विद्यार्थी, व्यापाऱयांना ही पॅसेंजर सोयीची ठरते. इंधनाचे दर वाढल्याने प्रवासी रेल्वेला प्राधान्य देत आहेत. कोल्हापूर ते सातारा मार्गावरील हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, सांगली, कराडसह साताऱयापर्यंतची लोहमार्गाच्या परिसरातील गावांना पॅसेंजरचा लाभ होतो. कोरोनामुळे 20 मार्च 2020 रोजी ही पॅसेंजर बंद करण्यात आली होती. कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर प्रवाशांकडून बंद असलेली पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी सुरू झाली होती. रेल्वे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत पहिल्या टप्प्यात कोल्हापूर-सातारा पॅसेंजर सुरू करण्याचा निर्णय घेतला.
कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश
कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना या कोल्हापूर-सातारा पॅसेंजरमधून प्रवास करता येणार आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने तसा नियम केला आहे. दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र प्रवाशांना दाखवावे लागणार आहे.
तीन पॅसेंजरसह पाच रेल्वे अजूनही बंद
कोल्हापूर-मिरज, कोल्हापूर-सांगली, कोल्हापूर-पुणे या तीन पॅसेंजरसह कोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणारी सहÎाद्री आणि कोल्हापूर-सोलापूर या महत्वाच्या रेल्वेगाड्या सध्या बंद आहेत. त्या सुरू करण्याची मागणी होत आहे.
अशी आहे पॅसेंजरची वेळ
मार्ग कोल्हापूर-सातारा
साताऱयाहून निघण्याची वेळ पहाटे 5ः30 वाजता
कोल्हापुरात पोहचण्याची वेळ सकाळी 9ः45 वाजता
कोल्हापुरात निघण्याची वेळ सायंकाळी 4ः45 वाजता
साताऱयात पोहचण्याची वेळ रात्री 9ः50 वाजता
कोल्हापूर-सातारा पॅसेंजरचा लाभ नोकरदार, विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांना होणार आहे. प्रशासनाने इतर बंद रेल्वेगाडÎा सुरू कराव्यात. कोरोना लसीच्या दोन डोसची सक्ती करू नये. सक्तीला आमचा विरोध आहे. – शिवनाथ बियाणी, सदस्य, रेल्वेची पुणे विभागीय सल्लागार समिती