प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाचा कहर शनिवारीही जिल्ह्यात कायम राहिला. शनिवारी 4 वाजेपर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यातील 7 जणांचा मृत्यू झाला. तर 58 नव्या रुग्णांची भर पडली. कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे.
आज झालेल्या मृतांमध्ये तळगुळ (ता. चंदगड) येथील 64 वर्षाचा वृद्ध, वाकरे (ता. करवीर) येथीला 65 वर्षाचा पुरुष, इचलकरंजी येथील लाखेनगर60 वर्षाचा पुरुष, जुना रोड येथील 69 वर्षाची वृद्धा, कबनुर (ता. हातकणंगले) येथील 46 वर्षाचा पुरुष, हातकणंगले येथील 65 वर्षाचा पुरुष तर मांडुकली (ता. गगनबावडा) येथील 68 वर्षाचा पुरषाचा मृतांमध्ये समावेश आहे.
शनिवारी 4 वाजेपर्यंत जिल्ह्यात 58 नव्या रुग्णांची भर पडली. यामध्ये शहरात 19, हातकणंगले 11, राधानगरी 11, करवीर 4, इचलकरंजी 6, गगनबावडा अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान उपजिल्हाधिकाऱयांच्या चालकास कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.