प्रतिनिधी / कोल्हापूर
सायबर चौकातील काटकर पार्क येथील एका महिलेला कोरोना संसर्गाची लागण झाल्याचे समोर आले आहे.यामुळे या महिलेसह तिच्या पतीला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
संबंधित महिला आणि तिच्या पतीला सीपीआरमध्ये दाखल करुन त्यांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.तर महापालिकेकडून काटकर पार्क परिसर सील करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.याठिकाणी तातडीने औषध फवारणीही करण्यात आली आहे.तसेच या दोघे आणखी कोणाच्या संपर्कात आले आहेत का याचा सर्व्हे करण्यात येत आहे.कोल्हापूर शहरात भक्तीपूजानगरमध्ये पहिला रुग्ण आढळला होता.यानंतर कसबा बावडा,कनाननगर,रंकाळा,अंबाई टँक,जुना बुधवार पेठ,राजारामपुरीतील शाहूननर,राजोपाध्येनगर याठिकाणी रुग्ण आढळले होते.यामुळे हे परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते.आता सायबर चौकातील काटकर पार्कात रुग्ण आढळल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.