महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय सेनेचे शिरोळ तहसीलदारांकडे निवेदन
प्रतिनिधी / शिरोळ
शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना शासनाने जाहीर केलेले साठ टक्के अनुदान लवकरात लवकर अदा करून व लॉकडाऊन काळात बंद असलेली ग्रंथालय त्वरीत सुरू करण्यासाठी शासनाने निर्णय घ्यावा यासह महत्वपूर्ण मागण्याचे निवेदन सोमवारी सकाळी शिरोळ तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांना देण्यात आले शिरोळ तालुका ग्रंथालय संघ व महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय सेना यांचा संयुक्त विद्यमाने सदर निवेदन अध्यक्ष बाळ बाबर, एम. एस. माने, राहुल मांगुरकर, संभाजी चव्हाण यासह ग्रंथालय सेवकांनी दिले
निवेदनात ग्रंथालय सेवकांना तात्काळ शासकीय वेतन लागु करावे जाहीर केलेले साठ टक्के अनुदान ग्रंथालय खात्यावर जमा करावे व ग्रंथालय वाढीसाठी दर्जा वाढ देण्यात यावी अनुदानात गेली कित्येक वर्षे न झाल्याने लवकरात लवकर चौपट वाढ करावी व लॉकडाऊनमध्ये बंद असलेली ग्रंथालय चालू करावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या प्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिरोळ तालुक्यातील दत्तात्रय भोसले रमेश सुतार स्वप्निल वासकर अर्जुन केरीपाळे बाबासो राजमाने नवनाथ कोळी आदी ग्रंथालय सेवक व पदाधिकारी उपस्थित होते.