प्रतिनिधी / सावर्डे
सावर्डे (ता. हातकणंगले) येथील ६५ वर्षीय वृध्दाचा कोरोनाने कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाल्याने सावर्डे व वडगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
सावर्डे ( ता. हातकणंगले) येथे दोन दिवसापूर्वी सावर्डे येथील एका नामवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्षांची प्रकृती अस्वस्थ्यामुळे कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. दरम्यान, येथील डॉक्टरांना संशय आल्याने या रुग्णाची कोरोना चाचणी घेण्यास सांगितली होती. यामध्ये त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांचेवर उपचार सुरु करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला. या मृत्युने सावर्डेसह परिसरात एकच खळबळ उडाली. या रुग्णाच्या संपर्कातील अन्य लोकांचे रिपोर्ट अद्याप प्रलंबित आहेत.
ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने गावात जंतुनाशक फवारणी व जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. गावात कडक लॉकडाऊन करण्यात आला असून पोलीस प्रशासनानेही गावात बंदोबस्त ठेवण्याची गरज आहे. कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या उपाययोजनांना नागरीकांनीही प्रतिसाद देणे आवश्यक आहे. गावात सध्या दोन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यातील एक रूग्णाचा मृत्यू झाला आहे.नागरीकांनी घरीच थांबून सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.