रविकांत आडसूळ यांचा एज्युकेशनल प्रोग्राम : शनिवार महापालिका शाळांसाठी राखीव
संजीव खाडे / कोल्हापूर
जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर महापालिकेच्या सेवेत आलेल्या उपायुक्त रविकांत आडसूळ यांच्याकडे दहा ते बारा विभागांची जबाबदार प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सोपविली आहे. त्यामध्ये महापालिकेच्या निवडणुकीच्या जबाबदारीबरोबर इस्टेट आणि सर्वात महत्वाचा प्राथमिक शिक्षण विभाग यांचा समावेश आहे. सर्व विभाग सांभाळताना महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढविण्यावर भर देण्याच्या दृष्टीने आडसूळ यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचे प्रत्यंतरही शनिवारी आले. महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांच्या विकासासाठी साप्ताहिक सुट्टीतील प्रत्येक शनिवार हा त्यांनी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांनी शनिवारी शहरातील महापालिकांच्या शाळांना भेटी देऊन तेथील वस्तुस्थितीची माहिती घेतली.
उपायुक्त आडसूळ यांनी जिल्हा परिषदेच्या सेवेत असताना प्राथमिक शिक्षण अधिकारीपदाचीही जबाबदारी पार पाडली होती. आपल्या कल्पक नियोजनातून त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्तावाढीला हातभार लावला होता. ई लर्निंगबरोबर डीजिटल प्लॅटफॉम उभे करणे, कॉम्युटर लॅबची उभारणी, ऑनलाईन शिक्षण आणि टेक्नोसॅव्ही शिक्षकांचा वापर खुबीने करत त्यांच्या ज्ञानाचा लाभ विद्यार्थ्यांना कसा होईल या संदर्भात नियोजन केले होते. आता महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून शाळांच्या गुणवत्तावाढीचे प्रयत्न त्यांनी सुरू केले आहे. त्याचे सुतोवाच त्यांनी पत्रकारांबरोबरच्या पहिल्या भेटीत केले होते. त्यानुसार त्यांनी कामही सुरू केले आहे.
प्रत्येक शनिवार महापालिकेच्या शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी
महापालिकेतील इतर विभागांच्या जबाबदाऱया पार पाडत असताना शिक्षणालाही महत्व देणे आवश्यक आहे. आठवडÎातील पाच दिवस त्यासाठी पुरत नाहीत. त्यामुळे साप्ताहिक सुट्टीतील प्रत्येक शनिवार उपायुक्त आडसूळ यांनी महापालिकेच्या शाळा, विद्यार्थ्यांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ते शनिवारी ऑन डÎुटी असतात. महापालिकेच्या शाळेत जाऊन तेथील प्रत्यक्ष स्थितीची आणि आवश्यक गोष्टींची माहिती घेणे, शिक्षक, विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचे काम उपायुक्त आडसूळ यांनी सुरू केले आहे. सर्व शाळांशी संवाद, संपर्क झाल्यानंतर गुणवत्तावाढी व इतर सुविधाबाबत प्रोग्राम, नियोजन करण्यात येईल, असे उपायुक्त आडसूळ सांगतात.
बंद शाळा सुरू करणार
महापालिकेच्या बंद पडलेल्या शाळांची माहिती घेण्याचे काम उपायुक्त आडसूळ यांनी सुरू केले आहे. शाळा का बंद पडल्या, त्याची कारणे काय आहेत?, त्याचबरोबर महापालिकेच्या शाळेत आपल्या पाल्यांना पाठविणाऱया पालकांची मानसिकता कशी आहे?, त्यांच्यासाठी काय करता येणे शक्य आहे?, शाळेत कोणत्याही आधुनिक सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल, त्यासाठी शिक्षकांना कोणते प्रशिक्षण देणे आवश्यक आहे? आदी बाबींवर सध्या उपायुक्त रविकांत आडसूळ काम करत आहेत.
आठवड्यातील पाच दिवस विविध विभागांची कामे असतात. त्यामुळे महापालिकेच्या शाळांसाठी एक दिवस देण्याचे ठरविले. त्यासाठी शनिवारचा पर्याय माझ्याकडे आहे. त्यामुळे शनिवारी सकाळपासून शाळांना भेट देऊन विद्यार्थी, शिक्षकांशी संवाद साधत आहे.
-रविकांत आडसूळ, उपायुक्त कोमनपा.