पुलाची शिरोली / वार्ताहर
कोरोना संदर्भात वेळोवेळी मिळणार्या सूचनांचे काटेकोर पालन करुन आपण आपली सेवा बजावली पाहिजे. अशा सूचना विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी दिल्या. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवारी आयोजित कोरोना योद्धे पोलिस हवालदार संजीत जगताप यांच्या शोकसभेत ते बोलत होते. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर प्रमुख उपस्थित होते.कोरोनाची लढाई प्रदीर्घ चालणार आहे. त्यामुळे खचून चालणार नाही, असे मत जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी व्यक्त केले. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.
या शोक सभेला पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, मंगेश देसाई, स.पो.नि. मेघा पाटील,किरण भोसले, पोलिस उपनिरीक्षक एस. एस. लोखंडे, सहायक फौजदार आर. बी. ठाणेकर, ए. बी. पोवार, सुशांत चव्हाण, भांडवलकर, पञकार अभिजित कुलकर्णी, सुरेश पाटील, सुनिल सुर्यवंशी, सतिश पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.