दिवाळीचे औचित्य साधून दिव्यांग मुलांचा उपक्रम : अनेक वर्षांची जोपासली परंपरा
लॉकडाऊन काळातही बनविले दिवाळीसाठी लागणारे साहित्य व भेट वस्तू बॉक्स
विक्रीच्या मिळालेल्या पैशातून विद्यार्थ्यांना बोनस व विद्यावेतन
नंदकुमार तेली / कोल्हापूर
स्वयंम-चेतना संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीचे औचित्य साधून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी (बौध्दिक अक्षम/गतीमंद) ‘वर्क फ्रॉम होम’ च्या माध्यमातून उपक्रमाची परंपरा जोपासली आहे. या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या साहित्य व भेट वस्तू बॉक्सच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून विद्यार्थ्यांना बोनस व विद्यावेतन स्वरुपात आर्थिक हातभार लावला जातो. यामुळे त्यांच्यासह कुटुंबीयांची दिवाळी आनंदाची होण्यास मदत होते.
स्वंयम संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना बोनस
इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित स्वयंम विशेष मुलांच्या शाळेत एकुण 56 मुले-मुली आहेत. स्वयंम उद्योग केंद्रातर्फे शाळेची स्थापनेपासून (25 जून 1990) दिवाळीचे औचित्य साधून भेट वस्तू बॉक्स तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून कोरोनाच्या काळातही परंपरा जोपासली आहे. 18 वर्षावरील मुला-मुलींनी या उपक्रमात उर्त्स्फूत सहभाग नोंदवून भेटवस्तू बॉक्स तयार केले आहेत. यामध्ये उटणं, साबण, मेहंदी कोन, रांगोळी, रंगीत-नक्षीदार पणत्या, बजाज अनमल तेल आदी वस्तूंचा समावेश आहे. एका बॉक्सची किंमत 150 ते 185 रुपये असून दरवर्षी 2 हजारपेक्षा अधिक बॉक्सची विक्री होते. यातून मिळालेल्या पैशातून विद्यार्थ्यांना बोनस दिला जातो. यातून ते आपल्या कुटुंबीयांना भेटवस्तू घेऊन दिवाळीसाठी हातभार लावतात.
कारखानदारांकडूनउपक्रमालाआर्थिकहातभार
मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, सांगली आदींसह कोल्हापूरातील रोटरी क्लब, एमआयडीसी, स्टार एमआयडीसी कागल आदी ठिकाणचे कारखानदार दरवर्षी आपल्या कामगारांसह नातेवाईक मित्रपरिवाराला देण्यासाठी भेटवस्तू खरेदी करतात. यामुळे उपक्रमाला आर्थिक हातभार लागून बोनस मिळतो आणि दिव्यांगांची दिवाळीही आनंदाची होते. मुलांना आपणही आपल्या कुटुंबासाठी कमवून आर्थिक हातभार लावल्याचे समाधान मिळून उपक्रमाचा उद्देश साध्य होतो. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा संस्थेचे अध्यक्ष दौलत देसाई, उपाध्यक्ष व्ही. बी.पाटील, अमरदीप पाटील, उद्योग केंद्राच्या अध्यक्षा शोभा तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक बाजीराव माने, बाजीराव माने, मुख्याध्यापक प्रमोद भिसे, प्रसाद माजगांवकर, उमाकांत तौर, सुनिल गुरव, ललिता वाईंगडे, रोहिणी चितारी आदींसह कर्मचारी वर्गाने परीश्रम घेत आहेत.
चेतनातर्फेविद्यार्थ्यांनाविद्यावेतन
शेंडा पार्क येथील चेतना विकास मंदिरतर्फे दरवर्षी सुमारे 4 ते 5 हजार भेटवस्तू बॉक्सची विक्री केली जाते. यातून मिळालेल्या पैशातून विद्यार्थ्यांना विद्यावेतन (स्टायफंड) दिले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शाळेला सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांकडून वर्क फॉर्म होम देण्यात आले. याअंतर्गत त्यांनी पणत्या रंगवणे, 5 प्रकारचे आकाश कंदील, घडी कामाची तोरणे, 2 प्रकारचे छोटे आकाश कंदील, पारंपरिक आकाश कंदील आदी दिवाळीसाठी लागण्यारे साहित्य तयार केले. तसेच भेटवस्तू बॉक्सही तयार केले असून यामध्ये पणती, उटणं, बदाम तेल, मोती- मैसूर सॅण्डल साबण आदी वस्तूंबरोबर हॅण्डवॉश, सॅनिटायझरचा समावेश आहे. बॉक्सची किंमत 270 ते 310 रुपये आहे.
याची खरेदी मनुग्राफ, किर्लोस्कर, जाधव इंडस्ट्रीज, शिपुगडे कंपनी, मार्वलस कंपनी, एलआयसी आदी कोल्हापूरातील कंपन्यांसह पुणे, मुंबईतील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, हितचिंतक करतात. संस्थेतर्फे ना नफा, ना तोटा या तत्वावर उपक्रम राबविण्याला जातो. शाळेतील 200 पैकी 100 मुले 18 वर्षावरील मुले 100 असून 70 मुलांनी उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका उज्वला खेबुडकर, व्यवस्थापकीय अधीक्षक कृष्णात चौगले, संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष पवन खेबुडकर आदींसह शाळेच्या कर्मचारी स्टाफ परीश्रम घेत आहेत.