येलूर फाट्यावर गोकुळ दूध संघाचा टँकर फोडला
प्रतिनिधी / कोल्हापूर
दूध दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिनानी शेतकरी संघटनेने आज दि. 21 जूलै रोजी ‘दूध बंद’ आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाला सुरुवात झाली असून आज सकाळी स्वाभिनानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुणे-बंगळुरु महामार्गावरील येलूर फाट्याजवळ गोकुळ दूध संघाचा टँकर फोडला. हा टँकर 25 हजार लिटर दूध घेऊन मुंबईला जात होता.
अशीच दुध वाहतूक सुरु राहिल्यास प्रत्येक टँकर फोडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.