प्रतिनिधी/गडहिंग्लज
कोण म्हणतं कोरोनावर मात करता येत नाही ? हे गडहिंग्लज तालुक्यातील हडलगे येथील 102 वर्षाच्या आजीबाईने सिध्द करून दाखवले. 102 वर्षाच्या आजीबाईवर घरीच उपचार करून कोरोनामुक्त करण्याचा पहिला यशस्वी प्रयोग गडहिंग्लज तालुक्यात झाला आहे. यासाठी आरोग्य, महसूल खात्याच्या यंत्रेने मोठे परिश्रम घेतले आहेत.
हडलगे येथील एकाच कुटूंबातील पती-पत्नीला कोरोना झाल्याचे समजल्यानंतर त्यांना शेंद्री माळावरील कोविड केअर सेंटर येथे हालवण्यात आले. त्यावेळी घरी आजी आणि अपंग नात असे दोघे राहिले. त्यानंतर आजीना ही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. घरी अपंग नात असल्याने आणि आजीचे वय 102 वर्ष असल्याने त्यांना गडहिंग्लजला उपचाराला हालवणे जिकीरीचे झाले. यावर जिल्हाधिकाऱयाशी स्थानिक प्रशासनाने चर्चा केल्यानंतर आजीवर घरातच उपचार करण्याचा निर्णय झाला. यासाठी मुंगूरवाडी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय खारोडे, पी. बी. तनुगडे, आरोग्य सेविका ए. वाय. नाईक, आशा वर्कर एस. जी. हुबळे, व्ही. बी. कांबळे यांची नेमणूक केली. आजीवर घरीच उपचार सुरू केले. वैद्यकीय डॉ. दिलीप आंबोळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. व्ही. अथणी यांनी उपचारावर लक्ष ठेवले. प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांनी सातत्याने हडलगे येथे सदर आजीबाईची भेट घेवून उपचाराची माहिती सुरू ठेवले होते. अखेर या साऱयाच्या प्रयत्नाला यश आले. 102 वर्षाच्या आजीबाई कोरोनामुक्त झाल्या. जिल्हय़ातील पहिली घटना असून साऱयांना आजीबाईच्या जिद्दीचे कौतुक वाटत आहे.