प्रतिनिधी / शिरोळ
बंद घराचा घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील लोखंडी दरवाजा उचकटून त्यामधील 92 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेले असल्याची फिर्याद श्रीमती सुनिता श्रीकांत भोसले यांनी शिरोळ पोलिसात दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की हरोली ता शिरोळ येथील फिर्यादी सुनिता भोसले या 18 ते 20 जानेवारी दरम्यान परगावी गेल्या होत्या. या मुदतीत यांच्या बंद असलेल्या घराचे अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटामध्ये ठेवलेले पाच हजार रुपये रोख व 87 हजार रुपये किमतीचे सोन्याचे विविध प्रकारचे दागिने लंपास केले आहे. या घरफोडीचा तपास शिरोळ पोलीस करीत आहेत.