प्रतिनिधी / हातकलंगले
हातकणंगले येथील औद्योगिक वसाहतीमध्ये कामास असलेल्या 32 वर्षीय युवकाचा कोरोनो रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले होते पण आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. सदर युवक औद्योगीक वसाहतीमधील एका पाईप कंपनीत कामात होता. त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर लगेचच उपचाराकरिता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या कुटुंबाला क्वॉरंन्टाईन करण्यात आले होते. पण सकाळी या युवकाचा मृत्यू झाला.
हातकणंगलेमध्ये कोरोनामुळे मृत्यू पावल्याची ही दुसरी घटना असून याआधी एक 70 वर्षीय वृद्धांचा मागील आठवड्यामध्ये मृत्यू झाला होता. तर आज दुसऱ्या तरुणाचा मृत्यू झाल्याने हातकणंगले परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर सदर व्यक्तीचा मृतदेह हा नगरपंचायतीने पूर्ण सुरक्षितता बाळगत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.
यावेळी फक्त नगरपंचायतीच्या कर्मचार्यांना पीपीटी किट घालून स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी परवानगी देण्यात आली होती.