कोल्हापूर : हिंदू देव-देवतांसह छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱया समाजकंटकावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन स्थानिक गुन्हा अन्वेषणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना देताना ओंकार शिंदे, किसन खंदारे, आशितोष सोनवणे, अशोक पोतनीस आदी.
प्रतिनिधी / कोल्हापूर
सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या माध्यमातून एक समाजकंटक नास्तिक पंडित या नावाने अकाऊंट उघडून हिंदू देवी-देवता आणि युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्लील फोटो तयार करून त्या फोटो वरती शिवीगाळ करत आहे. या समाजकंटकांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, त्याला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी युथ सोशल पॉवर ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन सोमवारी शहर पोलीस उपअधीक्षक पेरणा कट्टे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना देण्यात आले. यावेळी यावेळी ओंकार शिंदे, किसन खंदारे, अशितोष सोनवणे, वीरेन पाटील्। अशोक पोतनीस आदींसह सर्व शिवभक्त उपस्थित होते.