प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापुरात `प्रीत तुझी माझी’ या चित्रपटात खलनायक नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांचे बोट धरून मी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या जयप्रभा स्टुडिओमध्ये बहुतांश चित्रपट केले. कोल्हापूरच माझी कर्मभुमी आहे, कोल्हापुरनेच मला घडवले, अशा शब्दात अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक महेश कोठारे यांनी कलानगरीविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोल्हापुरातील सिने-नाटÎ दिग्दर्शक व खलनायक नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या नावाने दिल्या जाणाऱया कलायात्री पुरस्काराने महेश कोठारे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी डॉ. सुजय पाटील यांनी कोठारे यांची प्रकट मुलाखत घेतली. डॉ. पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे खुमासदार शैलीत देत, कलाकार, उमदा दिग्दर्शक, निर्माता कसा घडला जातो. याचा उलगडा ओघवत्या भाषेत कोठारे यांनी केला. त्यांनी मराठी, हिंदी, गुजराती भाषेतील चित्रपटांची निर्मिती, चित्रिकरण, लिखाण करतानाचे किस्से सांगत प्रेक्षकांना चित्रपट सृष्टीतील आपल्या यशस्वी वाटचालीची माहिती दिली. `झपाटलेला’ चित्रपटातील तात्या विंचू, `थरथराट’ चित्रपटातील टकलू हैवान, `धडाकेबाज’ चित्रपटातील कवटÎा महाकाळ या खलनायकांच्या नावाची निर्मिती कशी झाली. हिंदी चित्रपट करताना मोठÎा दिग्दर्शकांनी कसे सहकार्य केले. गुजराती भाषेतील चित्रपट करताना गुजराती भाषा शिकण्यापासून कशी तयारी करावी लागली, आदी गोष्टींचा कोठारे यांनी उलगडा केला. जयशंकर दानवे यांच्या बोटाला धरून चित्रपट सृष्टीत आलो, त्यांच्याच नावाचा पुरस्कार मिळाल्याने मी माझे भाग्य समजतो, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. डॉ. पाटील यांच्या प्रश्नांना उत्तर देताना कोठारे यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवली. त्यांनी केलेल्या विनोदावर सभागृहाने टाळया वाजवून दाद दिली. यावेळी लेखिका जयश्री दानवे लिखित नेलोडियस, अक्षरदीप, अलौकिक पुस्कांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अनुपमा चव्हाण यांनी सुत्रसंचालन केले. राजदर्शन दानवे यांनी आभार मानले.आशिष भागवत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापुरविषयी मला प्रेम…
ज्या कोल्हापुरने मला घडवले त्या कोल्हापुरविषयी माझ्या मनात वेगळया भावना आहेत. त्यामुळेच मी कोल्हापुरातच `दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेचे चित्रिकरण करण्याचा निर्णय घेतला, असे सांगत कोल्हापुरविषयीचे प्रेम कोठारे यांनी व्यक्त केले.