सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त
वार्ताहर / हुपरी
हुपरी ता. हातकणंगले येथील तळंदगे हुपरी बायपास रोडवर घोरपडे कॉलनीकडे जाणाऱ्या रोडवर गुटखा पान मसाल्याची अवैधरित्या विक्री करणाऱ्या एकास अटक व गुटखा वाहतुक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या गाडी मालकाच्या नावे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 7 लाख 87 हजार 464 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांच्या पथकाने केली.
स्वप्नील संजय मगदूम वय22 रा.बिरदेवनगर रेंदाळ यांना अटक केली आहे, सुजित जयसिंग घराळ (रा. घोरपडे कॉलनी हुपरी) यांचेवर हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
स्वतःच फायद्यासाठी तंबाखूजन्य पदार्थाचे विक्री करण्यास महाराष्ट्र राज्यात बंदी असतानाही विविध प्रकारचा गुटखा, पानमसाला विक्री करण्यासाठी स्वप्निल मगदूम हा सुजित घराळ यांच्या तवेरा गाडीतून नेत असल्याची माहिती पोलिसांना समजताच तळंदगे – हुपरी बायपास रोडवरील घोरपडे कॉलनीकडे जाणाऱ्या रोडवर 7लाख 87हजार 464 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तवेरा गाडीत विमल कंपनीचा पानमसाला ,व्ही 1कंपनीची तंबाखू ,M सुगंधी तंबाखू ,आर एम डी पान मसाला, हिरा पानमसाला ,रॉयल 717 कंपनीची तंबाखू व इतर कंपनीचे पान मसाले, तंबाखू घेऊन जात असल्याने पकडून हुपरी पोलीस ठाण्यात फिर्याद अमोल आकाराम कोळेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी दिली आहे. पुढील तपास पी. एस. आय.विजय मस्कर करीत आहेत.