टर्फच्या कामाची केली पाहणी : वस्तीगृहासाठी निधी उपलब्ध करण्याचे दिले आश्वासन
प्रतिनिधी / कोल्हापूर
हॉकी स्टेडियम येथे टर्फसाठी भरघोस निधी उपलब्ध झाला आहे. स्टेडियम आंतारराष्ट्रीय दर्जाचे करण्यासाठी टर्फच्या कामात कोणतीही तडजोड न करता काम दर्जेदार करा, अशी सूचना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केली. तसेच स्टेडीमयलगत असलेल्या मोकळ्या जागेत वस्तीगृह उभारण्यासाठी आराखडा तयार करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
हॉकी स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे टर्फचे काम सुरु आहे. शुक्रवारी खासदार संभाजीराजे छत्रपती, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जिल्हा हॉकी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय साळोखे यांनी पाहणी केली.
पाहणी दरम्यान खासदार संभाजीराजे यांनी मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवायचे आहे. यासाठी आराखडÎानुसरा टर्फचे काम दर्जेदार होणे गरजेचे आहे. कामासाठी निधीही भरघोस उपलब्ध झाला आहे. त्यामुळे कामात तडजोड नको. काम दर्जेदार करा अशी सुचना खासदार संभाजीराजे यांनी केली. यावेळी जिल्हा हॉकी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय साळोखे यांनी हॉकी स्टेडियमलगत असलेल्या अडीच एकर जागेत वसतीगृह उभारण्याची मागणी केली. यावर खासदार संभाजीराजे यांनी वसतीगृह उभारण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन देत आराखडा तयार करण्याची सूचना मनपा अधिकाऱयांना केली.
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी टर्फच्या कामासोबतच वसतीगृहाचे कामही पूर्ण करण्याचे नियोजन करा. दोन्ही कामांचा मास्टर प्लान तयार करा. खेळाडूंना येथे कोणत्या सुविधा गरजेच्या आहेत याची माहित्या घ्या. त्यानूसार साधारणतः आठ संघ राहू शकतील अशा पद्धतीचा आराखडा तयार करण्याची सूचना अधिकाऱयांना केली. तसेच क्रीडा कार्यालय, जिल्हा नियोजनमधून यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करु असे सांगितले.