ई-लिलावाच्या आधारे पुरवठा – विशेष योजना कंपनीने आखली
नवी दिल्ली
कोल इंडिया लिमिटेड (सीआयईएल) यांनी वीज क्षेत्रासाठी विशेष मोहिम राबवत ई-लिलाव योजनेच्या अंतर्गत एप्रिल ते सप्टेंबरमध्ये 173.4 लाख टन कोळशाचा पुरवठा केला आहे. जो वर्षाच्या आधारे पाहिल्यास 72.1 टक्के अधिक आहे.
सरकारी आकडेवारीनुसार सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने सदरच्या योजनेच्या अंतर्गत एक वर्षाअगोदर 100.7 लाख टन कोळसा पुरवठा केला होता. साधारणपणे यामध्ये सप्टेंबरमध्ये वीज क्षेत्रासाठी या योजनेच्या अंतर्गत कोळसा पुरवला असल्याची माहिती आहे.
लांब कालावधीसाठी सुविधा
येत्या काळातही ग्राहकांना कोळसा उपलब्ध करुन देण्यासाठी ई लिलावाचा वापर करण्यात येणार असून याच्या आधारे दीर्घ कालावधीसाठी अशा प्रकारेच कोळसा पुरवठा करण्यावर कंपनीचा भर राहणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.