आर्थिक वर्ष एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021मधील आकडेवारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चालू आर्थिक वर्षामधील एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021च्या दरम्यान कोळसा आयातीमध्ये 13.6 टक्क्यांची घसरण आली आहे. या कालावधीत चालू आर्थिक वर्षात देशात 196.13 दशलक्ष टन कोळसा आयात करण्यात आला आहे. एक वर्षाच्या समान कालावधीत हा आकडा 227.23 दशलक्ष टनावर राहिला आहे, अशी माहिती टाटा स्टील आणि सेलच्या जॉईंट वेंचरच्या अहवालामध्ये देण्यात आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार एप्रिल ते फेब्रुवारी 2020-21 च्या दरम्यान एकूण 196.13 दशलक्ष टन कोळसा आणि कोकची आयात झाली आहे. एप्रिल ते फेब्रुवारी 2019-20मध्ये हा आकडा 227.23 दशलक्ष टनाच्या तुलनेत 13.69 टक्क्यांनी कमी आहे. एप्रिल ते फेब्रुवारी 2020-21 दरम्यान 128.91 दशलक्ष टन नॉन कोकिंग कोलची आयात करण्यात आली होती. एक वर्षाच्या अगोदर समान कालावधीत हा आकडा 157.59 दशलक्ष टन राहिल्याची नोंद आहे.
फेब्रुवारी 2021 मधील आकडा
फेब्रुवारी 2021 महिन्यात 15.29 दशलक्ष टन कोळशाची आयात झाली आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये नॉन कोकिंग कोळशाची आयात ही 9.07 दशलक्ष टन राहिली होती.
अधिकच्या मालवाहतुक दराचा प्रभाव
प्राप्त अहवालानुसार थर्मल कोल आयातीमध्ये घसरण आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये अधिकच्या मालवाहतुक दरामुळे फेबुवारीत कोळसा आयातीत मोठी घसरण राहिल्याची नोंद करण्यात आली आहे.