सरकारी अधिकाऱयांची माहिती : सध्या कोळशाची स्थिती समाधानकारक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असणारी कोल इंडिया लि.सोबत इतर खाण उत्पादकांच्या उत्पादनात वृद्धी होत असल्यामुळे वर्ष 2022 मध्ये देशातील कोळसा उत्पादनात मोठी वाढ होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोळसा पुरवठय़ाची स्थिती सध्या स्थिर झाली असून आता इंधनाचा पुरवठा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले जात असल्याचेही सांगितले जात आहे.
सरकारी मुख्य अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार वीज प्रकल्पांमध्ये आता त्यांच्या गरजेनुसार थोडा अधिकचा कोळसा मिळत असल्याचे म्हटले आहे. यामध्ये कोळसा सचिव अनिल कुमार जैन यांनी सांगितल्याप्रमाणे 2015 ते 2020 च्या दरम्यान लिलाव करण्यात आलेल्या कॅप्टिव कोळसा ब्लॉक, व्यावसायिक खुदाईमुळे मागील वर्षात विक्रीसाठी ठेवला होता. यामुळे कोल इंडियाच्या उत्पादनात अधिकची वृद्धी राहणार असल्याची माहिती दिली जात आहे.
आगामी आर्थिक वर्षात
आगामी आर्थिक वर्षात 2022-23 मध्ये आम्ही कोळसा उत्पादनामध्ये विशेष वृद्धी राखणार असल्याचे स्पष्टीकरण जैन यांनी यावेळी दिले आहे. मागील आर्थिक वर्षात सीआयएलने जवळपास 59.6 कोटी टन कोळसा उत्पादन केले होते. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 64 कोटी टन कोळसा उत्पादन करण्यात आल्याची माहिती आहे.