तिमाही नफा कमाईत बँकेची 55 टक्क्यांची उसळी
वृत्तसंस्था / मुंबई
कोविडच्या संकटात अनेक क्षेत्रांची आर्थिक घडी विस्कटल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये वाहन, इंधन, कच्चे पोलाद आदींसह अन्य क्षेत्रांचा प्रामुख्याने समावेश राहिला होता. परंतु आर्थिक क्षेत्रातील बँकिंग सेवा मात्र यावेळी सुरु ठेवण्यात आली होती. याचाच एक सकारात्मक बदल म्हणून भारतीय स्टेट बँकेने(एसबीआय) तिमाहीमध्ये नफा कमाईत उच्चांकी उसळी नेंदवली आहे.
स्टेट बँकेच्या अगोदर आयसीआयसीआय बँकेने मजबूत कामगिरी नोंदवली होती. चालू आर्थिक वर्षातील दुसऱया तिमाही दरम्यान थकीत कर्जात कमी आली असल्यानेच बँकेचा निव्वळ नफा 55 टक्क्यांनी वधारुन 5,246.88 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे.
स्टेट बँकेने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षातील जुलै ते सप्टेंबर तिमाहीत निव्वळ नफा कमाई 3,375.40 कोटी रुपयांवर राहिली होती. एसबीआय समूहाचे एकूण उत्पन्न समीक्षकांच्या माहितीनुसार तिमाही दरम्यान वधारुन 95,373.50 कोटींच्या घरात पोहोचले आहे. जे एक वर्षाच्या अगोदर समान तिमाहीत 89,347.91 कोटी रुपयांवर स्थिरावले होते. ठळक नोंदी…
30 सप्टेंबर 2020 पर्यंत एकूण कर्जाच्या तुलनेत बँकेचा एनपीए 5.28 टक्क्यांनी घटला आहे. एक वर्षाच्या अगोदर समान कालावधीत हा आकडा 7.19 टक्क्यांवर स्टँडअलोन नफा जवळपास 52 टक्क्यांनी वधारुन 4,574.16 कोटींच्या घरात