एक अभ्यासानुसार कोविडमधून बरे झालेल्या लोकांत पचनाच्या तक्रारी उद्भवल्या आहेत. याकडे वेळेवर लक्ष दिले तर अपचनाचा त्रास होणार नाही. काही गोष्टींचे आकलन केल्यास या तक्रारी कमी होतील आणि दीर्घकाळापर्यंत त्याचा सकारात्मक परिणाम राहू शकतो.
- कोरोनातून बरे झाल्यानंर पचनशक्तीत समस्या येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्याच्यावर तातडीने उपचार करणे गरजेचे आहे.
- कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांनी मसालेदार जेवण, तेल, प्रोसेस्ड फूड यापासून दूर राहिले पाहिजे. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि उपचार केल्यास आपण पूर्वीसारखे सामान्य जीवन जगू शकता.
याकडे लक्ष द्या
- कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेकांना भूक कमी लागणे, भूक अधिक लागणे, पोटाचा वरचा भाग दुखणे, ऍसिडीटी होणे, अतिसार, उलटी येणे यासारख्या समस्या पाहवयास मिळतात.
- पचनशक्तीत निर्माण झालेल्या समस्या या गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रक्टबरोबरच लिव्हर, पॅनिक्रीयाज, पित्ताक्षयच्या क्रियेवर परिणाम करतात.
- कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आरोग्याचे योग्य आकलन, स्वतःची काळजी आणि डॉक्टरांशी संपर्क ठेवणे आवश्यक आहे.
आहार कसा असावा?
- ताजी फळे, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्ये याच्यासह संतुलित पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश करावा. फायबर आणि हेल्दी फॅटचे पदार्थ खावेत.
- आतडय़ाला सक्षम ठेवण्यासाठी प्रोबायोटिक्सचे सेवन करावे. सतत पाणी पिणे आणि हायड्रेटेड राहणे गरजेचे आहे.
- जंक फूड, मसालेदार, प्रोसेस्ड, चटकदार आणि गोड खाण्यापासून दूर राहवे. कार्बोनेटेड पेय घेऊ नये. आम्ल आणि पोट फुगवणारे खाद्यपदार्थ खावू नयेत. मद्यपान आणि धुम्रपान करु नये. याशिवाय अधिक प्रमाणात हर्बल पेय करण्याचे टाळावे.
- आपापल्या क्षमतेनुसार व्यायाम करावा. यामध्ये योगाला प्राधान्य द्या. यामुळे फुफ्फुसांची हानी भरून निघण्यास मदत होईल. शरीराला ऑक्सिजन पुरवठा भरपूर झाल्यास अनेक समस्यांची तीव्रता कमी होते.
– डॉ. भारत लुणावत