मडगाव नगराध्यक्ष लिंडन पेरेरा यांच्याकडून सोनसडय़ावर पाहणी
प्रतिनिधी / मडगाव
मडगाव पालिका क्षेत्रातील अनेक कोविडबाधित हे घरातच विलगीकरणात राहतात. त्यांच्या कचऱयाची मडगाव पालिकेकडून करण्यात येत असली, तरी सदर कचरा नंतर सोनसडा येथे नेण्यात येतो. परंतु तेथून त्याची उचल केली जात नाही वा विल्हेवाट लावली जात नसल्याचे आढळून आल्याने संताप व्यक्त करण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष लिंडन पेरेरा यांनी गुरुवारी सोनसडय़ाला भेट दिली व आवश्यक कृती करण्याचे निर्देश दिले.
शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो व कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी यावर आवाज उठविला होता. आमदार लॉरेन्स यांनी रस्त्यावर येण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पेरेरा यांनी सोनसडय़ाला भेट देऊन पाहणी केली. प्राप्त माहितीनुसार, मडगाव पालिकेने घरांमध्ये विलगीकरणात राहणाऱया कोविडबाधितांच्या घरी जाऊन कचरा गोळा करण्यासाठी एक खास पथक तैनात केले आहे. त्यामार्फत कचरा उचल होत असली, तरी तो नंतर सोनसडा कचरा यार्डात नेण्यात येत असतो. तेथून सरकारने नियुक्त केलेल्या एजन्सीने त्याची उचल करून नंतर या जैववैद्यकीय कचऱयाची शास्त्राsक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. मात्र मागील काही दिवसांपासून हे काम होत नसल्याने कचरा पडून असल्याने येथे काम करणाऱया कर्मचाऱयांना संसर्ग होण्याची शक्मयता वर्तविण्यात येत होती.
यासंदर्भात पेरेरा यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, घनकचरा व्यवस्थापन महामंडळाचे अधिकारी लेविन्सन मार्टीन्स यांच्याशी त्यांनी संपर्क साधला. त्यांनी संबधित यंत्रणेला कचरा उचल करण्यास सांगतो असे स्पष्ट केले आहे. पालिकेच्या सेनिटरी विभागाला आवश्यक रसायनाची फवारणी करून कचऱयाचे निर्जंतुकीकरण करण्यास सूचित केले आहे, असे नगराध्यक्षांनी नजरेस आणून दिले. आपण नंतर सेनिटरी निरीक्षकांना आवश्यक रसायनाची फवारणी करण्याचे निर्देश दिले. कोविडबाधितांच्या घरांतून कचरा उचल करून सोनसडय़ावर नेल्यावर आवश्यक निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत असतेच असे आपल्या नजरेस सेनिटरी निरीक्षकांनी आणून दिल्याचे पेरेरा यांनी सांगितले. दरम्यान, सोनसडय़ावर पडून असलेल्या कचऱयाची त्वरित उचल होण्याच्या दृष्टीने आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.