- विलगीकरणासाठी चार हजार, आयसीयूसह व्हेंटिलेटर नऊ हजार
- जादा दर आकारल्यास तक्रारी करा, कारवाई करणार
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोविडसाठी अधिग्रहीत केलेल्या खासगी रुग्णालयांनी आकारायचे दर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जाहीर केले आहेत आणि ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम रुग्णाकडून घेतली जात असेल तर रुग्णांनी जिल्हा
प्रशासनाकडे तक्रार करावी. त्यावर तात्काळ कारवाई करण्यात आहे. तसेच यावर लक्ष ठेवण्यासाठी तहसीलदारांना नियुक्त केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
जिल्हय़ातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा विचार करता अतिरिक्त उपाययोजना म्हणून जिल्हय़ातील चार खासगी रुग्णालये अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली आहे. यामध्ये कणकवली येथील डॉ. विद्याधर तायशेटे यांचे संजीवन सर्जिकल ऍण्ड ऍक्सिडेंटल हॉस्पिटल आणि मालवण येथील डॉ. विवेक रेडकर यांचे रेडकर हॉस्पिटल ऍण्ड रिसर्च सेंटर, पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटल आणि नाटळ येथील एक अशी चार रुग्णालये अधिग्रहित करण्यात आली आहेत.
सरकारी रुग्णालयात पूर्ण मोफत उपचार केले जातात. मात्र, खासगी हॉस्पिटलमध्ये अव्वाच्या सव्वा दर आकारले जात असल्याने शासनाने खासगी रुग्णालयाना दर निश्चित करून दिले आहेत. शासनाने मंजूर केलेले दर रुग्णालयांमार्फत आकारण्यात येणार आहेत. त्याप्रमाणे नियमित सेवा व विलगीकरणासाठी 4 हजार रुपये, व्हेंटिलेटरशिवाय आयसीयू 7 हजार 500 रुपये तर व्हेंटिलेटरसह आयसीयूचे दर 9 हजार रुपये या प्रमाणे शासनाने ठरवून दिले आहेत. हेच दर या जिल्हय़ातील चारही खासगी रुग्णालयामध्येही आकारण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली.
शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दर त्या खासगी रुग्णालयांना आकारता येणार नाहीत. जादा दर आकरल्यास कारवाई केली जाणर आहे. जास्त दर आकारले तर नागरिकांनीही तकारी कराव्यात. तात्काळ कारवाई करण्यात येईल. तसेच या खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना दिल्या जाणाऱया बिलांवर लक्ष ठेवण्यासाठी नायब तहसीलदारांना नेमण्यात आले आहे, असेही जिल्हाधिकाऱयांनी जाहीर केले आहे.