कोरोना संक्रमिताच्या संपर्कात आलेल्यांची सहज मिळेल माहिती
कोरोना पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात येणाऱया लोकांचा शोध घेण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये एक ऍप लॉन्च करण्यात आले आहे. या ऍपचे नाव ‘कोविड अलर्ट एनवाय’ असे ठेवण्यात आले आहे. या ऍपच्या माध्यमातून तुम्ही कोरोना संक्रमित लोकांच्या संपर्कात आला आहात किंवा नाही याची माहिती सहजतेने उपलब्ध होणार आहे. न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्रय़ू कुओमो यांनी याची घोषणा केली. या अŸपच्या घोषणेनंतर न्यू जर्सीचे गव्हर्नर फिल मर्फी यांनी ‘कोविड अŸलर्ट एनजे’ अŸपचे अनावरण केले. यावेळी त्यांनी कोरोना संकटाच्या वेळी बाधितांचा शोध लावण्यासाठी आम्ही टेसिंग अŸपचा आधार घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सदर दोन्ही ऍप ब्लूटूथचा वापर करून वापरली जातील. मात्र, यामध्ये कोणत्याही प्रकारचे लोकेशन टेस केले जाणार नाही. या ऍपद्वारे आपली वैयक्तिक माहिती घेतली जाणार नसल्यामुळे कोणालाही घाबरून जाण्याची गरज नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. हे ऍप पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला जात आहे.