वकिलांची जिल्हाधिकाऱयांकडे मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
सरकारी आणि नोंदणीकृत हॉस्पिटलनाच रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवठा केला जाणार आहे, असे सांगून खासगी हॉस्पिटल तसेच कोविड केअर सेंटरला रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्याचा मोठा फटका बसत आहे. तेव्हा सर्वांनाच रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
सर्वसामान्य जनतेला मोठय़ा हॉस्पिटलचा खर्च परवडणे कठीण आहे. त्यामुळे अनेक जण कोविड केअर सेंटरमध्येच उपचार घेत आहेत. त्यामधील अनेकांना रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज निर्माण होत आहे. मात्र, त्यांना ते इंजेक्शन देण्यास जिल्हा आरोग्य प्रशासन नकार देत आहे. त्यामुळे अनेक रुग्ण दगावत आहेत. रुग्ण वाचवायचे असतील तर कोविड केअर सेंटरनाही रेमडेसिवीर पुरविणे गरजेचे आहे.
सरकारी हॉस्पिटलपेक्षाही खासगी कोविड केअर सेंटरमधून कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या अधिक आहे. त्यासाठी कोविड केअर सेंटरनाच अधिक मदत करणे गरजेचे असताना जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वकिलांनी केला आहे. ऍड. एन. आर. लातूर यांनी याबाबत राज्य सरकारला पत्र लिहून कोविड केअर सेंटरना व खासगी हॉस्पिटलना रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.