लखनौ
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी शनिवारी पक्ष कार्यकर्त्यांना कोविड-19 नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच समाजवादी पक्ष लवकरच विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करेल, असेही ते म्हणाले. राज्यात कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे आपण कोविड प्रोटोकॉलचे पालन केले पाहिजे. नियम न पाळल्यास संसर्ग आणखी वाढू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. कोविड नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल समाजवादी पक्षाच्या 2,500 कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना सतर्क केले आहे.