१०६ जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
सातारा / प्रतिनिधी
काल रात्री उशीरा प्राप्त रिपोर्टनुसार सह्याद्री हॉस्पिटल, कराड येथे पाटण तालुक्यातील सदा दाढोली येथील ७० वर्षीय कोविड बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे वाई तालुक्यातील शेंदुरजणे येथील ६२ वर्षीय पुरुषाला सारीची लक्षणे असल्याने दाखल केले होते. काल नमुना तपासणी करीता पुणे येथे पाठविण्यात आला होता, दरम्यान काल रात्री उपचार सुरु असताना मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
१०६ जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
काल रात्री उशीरा एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड यांच्याकडून १०६ नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे कळविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.