धनाढय़ांमध्ये प्रसिद्ध मॅनहॅटनमधील इलेव्हन मॅडिसन रेस्टॉरंट
मांसजन्य पदार्थ हटविले, हिरव्या भाज्यांना पसंती
जगातील धनाढय़ांमध्ये लोकप्रिय मॅनहॅटन येथील (न्यूयॉर्क) इलेव्हन मेडिसन पार्क रेस्टॉरंटनने स्वतःच्या मेन्यूत मोठा बदल केला आहे. रेस्टॉरंट आता मीट आणि सी-फूड पुरविणार नाही. कोविड महामारीनंतर बदललेल्या स्थितीत पुन्हा सुरू झालेल्या या रेस्टॉरंटने हा निर्णय घेतला आहे. मागील 18 महिन्यांमध्ये आम्ही बरेच काही पाहिले-ऐकले आणि जाणले असल्याचे उद्गार चीफ शेफ डेनियल हम यांनी काढले आहेत.
महामारी फैलावण्याच्या कारणांमध्ये जागतिक खाद्यव्यवस्थतेतील कमकुवतपणा आणि विशेषकरून मांसाहारामुळे होणाऱया धोक्यांकडे दुर्लक्ष यांचा समावेश असल्याचे अनेक पर्यावरणतज्ञ आणि सामाजिक संस्थांचे म्हणणे आहे. पण मॅडिसन पूर्णपणे प्राण्यांकडून प्राप्त खाद्यसामग्रीपासून दूर होणार नाही. दूध, अंडी, मधयुक्त चहा पूर्वीप्रमाणेच मिळत राहणार आहे.
नव्या मेन्यूमध्ये सर्वाधिक भर हिरव्या भाज्या आणि नैसर्गिक उत्पादनांवर असणार आहे. ग्राहकही याला पसंत करतील कारण ही काळाची गरज असल्याचे डेनियलने म्हटले आहे. दुसरीकडे मॅडिसन पार्कच्या मेन्यूत झालेले बदल अन्य मोठे रेस्टॉरंट आणि फूड स्टेशन्सनाही आवडले आहेत.
25 हजारांपासून सुरू मल्टीकोर्स मेन्यू
इलेव्हन मॅडिसन पार्क रेस्टॉरंट जगातील 50 सर्वोत्कृष्ट रेस्टॉरंट्सपैकी एक आहे. याच्या मल्टीकोर्स मेन्यूची किंमत 25 हजार रुपयांपासून सुरू होते. मॅनहॅटनसह अमेरिकेच्या अन्य शहरांमध्ये तसेच इतर देशांमध्येही याचे 40 हून अधिक आउटलेट्स आहेत. पण आतापर्यंत त्यांची ओळख मांसाहारासाठीच निर्माण झाली होती.