बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात १० मेपासून पूर्ण लॉकडाऊनला सुरुवात होणार आहे. यावेळी राज्यात कडक निर्बंध असणार आहेत. दोन आठवड्यांच्या लॉकडाऊनसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. दरम्यान राज्यात लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी बेंगळूरचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी रविवारी लोकांना मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आव्हान केले आणि उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला.
“मी माझ्या सहकारी बेंगळूरच्या लोकांना सोमवारपासून लॉकडाऊन मार्गदर्शक तत्त्वांचे अधिक कडकपणे पालन करण्याचे आव्हान करतो. आम्ही एकत्र काम केल्यास, निवासस्थानी रहा, सुरक्षित रहा! असं पंत यांनी ट्विट केले.
मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. कोविड -१९ चा प्रसार रोखण्यासाठी सरकारने १० ते २४ मे पर्यंत लॉकडाऊनध जाहीर केला आहे. कारण राज्यात कोरोनाचा संसर्ग आणि संबंधित मृत्यूंमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. कोरोनाची साखळी तोडायची झाल्यास कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
राज्यात दररोज ५० हजाराहून अधिक रुग्ण सापडत आहेत. तर सक्रिय प्रकरणे सहा लाखांच्या जवळपास पोहोचली आहेत, ही संख्या देशात सर्वाधिक आहे. तसेच आतापर्यंत एकूण१८ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील बहुतेक रुग्णालये, विशेषत: बेंगळूर येथे बेडची कमतरता असल्याने खासगी रुग्णालयांनी कोविड -१९ रूग्णांसाठी ८० टक्के बेड राखून ठेवण्याची घोषणा केली आहे.