प्रतिनिधी/फोंडा
फोंडा तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाटय़ाने वाढू लागलेली आहे. यामुळे नियंत्रण राखण्याच्या दृष्टीकोनातून आमदार रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली फोंडय़ातील सर्व लोकप्रतिनिधी, पंच, सरपंचांनी राज्यस्तरिय कर्फ्यु च्या काळात युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्याविषयी महत्वाची तातडीची बैठक काल शनिवारी राजीव कला मंदिर येथे घेण्यात आली.
यावेळी मार्गदर्शक म्हणून आपत्ती व्यवस्थापन समितीअंतर्गत कोरोना व्यवस्थापनासाठी नेमलेले अधिकारी राजन सातर्डेकर यांनी सर्व लोकप्रतिनिधींच्या सुचना ऐकून घेतल्या. सर्व सुचनावर विचारविनीयम करून कोरोनाबाधितांसाठी तात्काळा सुविधा उभारण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी फोंडा पालीकेचे मुख्याधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रदीत नाईक, नगराध्यक्ष विश्वनाथ नाईक, रितेश नाईक, विलीयम्स आगियार, रितेश नाईक, गीताली तळावलीकर,शांताराम कोलवेकर यांनी सुचना मांडल्या.
कोरोनाविरोधी लढय़ात रवी नाईक यांची ऑक्सिजनयुक्त रूग्णवाहिका
फोंडा तालुक्याच्या सर्व ग्रामिण भागात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. यावर मात करण्यासाठी फोंडा तालुक्यात एकूण सात रूग्णवाहिका उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. आमदार रवी नाईक यांनी खास कोरोना रूग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध केलेल्या ऑक्सिजनची सुविधा असलेली रूग्णवाहिकेचे उद्घाटन आज होणार आहे. जेणेकरून रूग्णाला इस्पितळात पोचेपर्यत कोणतीच अडचण निर्माण होऊ नये. या व्यक्तीरीत समाजसेवक राजेश वेरेकर यांच्या दोन रूग्णवाहिका तसेच मगो पक्षातर्फे दोन रूग्णवाहिका तालुक्यात सेवा बजावत आहे. फोंडा पालीकेची एक रूग्णवाहिका उपजिल्हा इस्पितळात सेवेसाठी रूजू झालेली आहे. अशा तऱहेने एकूण सात रूग्णवाहिका फोंडा शहरात कार्यरत आहेत, गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार रवी नाईक यांनी केले आहे. तसेच गृह विलगीकरणा व्यक्तीरीत इतर रूग्णांसाठी कुर्टी येथील पशुसंवर्धन विश्राम गृहाचा विचार व्हावा असे आवाहन आमदार रवी नाईक यांनी केले आहे.
उपजिल्हाधिकारी पदीप नाईक यांनी लसीकरण मोहीम तीव्र करण्यासाठी पाऊले उचलण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच येत्या काळात फर्मागुडी येथे राष्ट्रीय स्वयं सेवाच्या स्वयंसेवकामार्फत कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी कॉल सेंटर तात्पुरत्या काळासाठी उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली. कोविड व्यवस्थापनाअंतर्गत कोविडबाधित रूग्णांना औषध व मानसिक आधार देण्याहेतून लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन देण्यासाठी सहा प्राध्यापकांची निवड करण्यात आल्याची माहिती सातार्डेकर यांनी दिली. कोरोना अहवाल सकारात्मक आल्यानंतर कोविड कीट मिळण्यास होणाऱय़ा अडचणीचे निवारण करण्यात येणार असल्याचे त्य़ांनी सांगितले. तसेच येत्या काळात पालीकेच्या सर्व प्रभागातील कोविड रूग्णविषयी माहिती प्रभागातील नगरसेवकापर्यत पोचविली जाईल जेणेकरून त्या रूग्णांला फोनवर संपर्क साधून अडचणी जाणून घेणे सोपे होईल. आरोग्य अधिकारी सहकार्य करीत नसल्याच्या तक्रारीवरही विचारविनीयम करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.