पणजी- गोवा प्रदेश युवक काँग्रेसने कोविड रूग्णांच्या मदतीसाठी आपल्या सेवांचा विस्तार करत शुक्रवारी कोविड रूग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी व ऑक्सजिन सिलिंडर्सची वाहतूक करण्यासाठी दोन वाहने सुरू केली आहे.
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, जीपीसीसीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अ??ड. वरद म्हार्दोळकर, काँग्रेस नेते जोएल आंद्रादे आदी उपस्थित होते. पणजी येथील काँग्रेस हाऊसजवळ या सेवेची सुरुवात केली.
मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी युवक काँग्रेसच्या कार्याचे कौतुक केले आणि म्हणाले की ते कठीण काळात लोकांची मदत करत आहेत. “गोवा कोविड संकटात सापडला आहे, परंतु भाजप सरकारने परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. अनेक ज्ये÷ नागरिक रुग्णालयात भेट देण्यासाठी मदतीची अपेक्षा करीत आहेत, कारण त्यांची काळजी घेण्यासाठी कोणीही नाही. यासाठी युवक काँग्रेस आशेचे किरण बनली आहे. ” असे कामत म्हणाले.
कामत म्हणाले की या कोविड परिस्थितीत लोकांचे प्राण वाचविणे हे प्राधान्य असले पाहिजे.
चोडणकर म्हणाले की, युवक काँग्रेसने लोकांना ऑक्सजिन देऊन मानवतेचे उदाहरण ठेवले आहे. “युवक काँग्रेसने इतर राजकीय पक्षांच्या अनेक समर्थकांनाही मदत केली आहे. आमचे ध्येय लोकांचे प्राण वाचविणे आहे. ” असे ते म्हणाले.
कोविडची साखळी तोडण्यासाठी लोकांनीही युवक काँग्रेसला मदत करण्याचे आवाहन चोडणकर यांनी केले आहे.
रूग्णालयांमध्ये ऑक्सजिनची आवश्यक व्यवस्था करण्यास सरकार अपयशी ठरल्याने युवक काँग्रेसने गेल्या पंधरा दिवसांत अनेक रूग्णांना रूग्णालयात ऑक्सजिन सिलिंडर देऊन त्यांना जीवनाचा श्वास दिला आहे.
“ऑक्सजिनची व्यवस्था करण्यात भाजपा सरकारला अपयश आले आहे आणि याचा पर्दाफाश डॉक्टरांनीच केला आहे. ऑक्सजिन नसल्याल्यामुळे डॉक्टर असहाय बनले आहेत. जेव्हा आम्ही रुग्णांना ऑक्सजिन सिलिंडर देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हे सिलिंडर आम्ही कोठे खरेदी केले याची चौकशी करण्यासाठी भाजप सरकारने आम्हाला पोलिस स्टेशनमध्ये बोलवून त्रास दिला. ” असे अ??ड. वरद म्हार्दोळर म्हणाले.
“काँग्रेस लोकांसाठी आणि कोविड रुग्णांसाठी काम करत असल्याचे या सरकारला ?लर्जी असेल तर त्यांनी स्वतः लोकांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि जर भाजपा कामगिरी करू शकत नसेल तर त्यांनी ते मान्य केले पाहिजे. त्यांना लोकांच्या जीवाशी खेळण्याचा कोणताही अधिकार नाही. ” असे म्हार्दोळकर म्हणाले.
अड. मर्दोलकर म्हणाले की ऑक्सजिन सिलिंडर्स सुरक्षित आणि पद्धतशीरपणे वाहतूक करता यावे या उद्देशाने हे वाहन सुरु केले गेले आहे. “लोक आमच्या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करु शकतात, आम्ही लवकरात लवकर त्यांना ऑक्सजिनचा पुरवठा करु. त्यांचे प्राण वाचविणे हे आमचे ध्येय आहे. ” असे ते म्हणाले.
याशिवाय युवा काँग्रेसने गरीब व गरजू रूग्णांना, तसेच ज्ये÷ नागरिकांनाही, उपचारासाठी रूग्णालयात नेण्यासाठी वाहन सुरू केले आहे. “अनेक लोकांनी आम्हाला कॉल करुन सांगितले की एम्ब?लन्स उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे आम्ही वाहनांची व्यवस्था केली. परंतु नंतर आम्हाला वाटले की या कारणासाठी खास वाहन असायला पाहिजे. त्यासाठी आम्ही ही सेवा सुरु केली आहे. सध्या हे वाहन उत्तर गोव्यासाठी उपलब्ध होईल आणि नंतर आम्ही दक्षिण गोव्यात त्याचा विस्तार करू. ” असे म्हार्दोळकर म्हणाले.
अड. मर्दोलकर म्हणाले की अशी अनेक कुटुंबे आहेत की ज्यांच्याकडे वाहने नसतात आणि म्हणूनच त्यांना रुग्णालयात पोहोचणे अवघड जाते. “आम्ही प्रत्येक उपयोगानंतर वाहन सॅनिटायझ करणार व चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू.” असे ते म्हणाले.