प्रतिनिधी/ सातारा
शनिवार पेठ येथील गजानन मंगल कार्यालय येथे सम्राट मंडळाच्या सहकार्याने कोविड रूग्णांसाठी कोविड सेंटर उभा करण्यात येत आहे. असे आम्हाला समजले आहे. हा संपूर्ण परिसर दाट लोक वस्तीचा आहे. या सेंटर भोवती 10 अपार्टमेंन्ट व 50 बसकी घरे आहेत. स्थानिक रहिवाशांना यामुळे कोरोनाची लागण होण्यास वेळ लागणार नाही. मुळातच हे सेंटर शासनाच्या नियमावलीत बसत नाही. हे सेंटर बेकायदेशीर पणे उभे करू नये. स्थानिक रहिवाशांना आपण विश्वासात घेतले नाही. यामुळे नागरिकांचा यास विरोध आहे. याच परिसरात न्यू इंग्लिश स्कूल आहे. ही शाळा एका बाजूस आहे. या ठिकाणी आपण सेंटर उभे करावे. आमचा कोविड सेंटरला विरोध नाही. पण रहिवाशी परिसरात सेंटरला मुळातच शासन परवानगी देत नाही. या सेंटरला कशी परवानगी देण्यात आली यांची चौकशी करावी. आपण या सेंटरला दिलेली परवानगी रद्द करावी अन्यथा आम्हाला नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी जन आंदोलन करावे लागेल. अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका आशा किशोर पंडित यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना केली आहे.