प्रतिनिधी/ मडगाव
मडगावच्या कोविड हॉस्पिटलात धर्मगुरूसह एकूण तिघांचे बळी गेले आहेत. काल शनिवारी रात्री मडगावच्या क्लर्जी होममधील एका 89 वर्षीय धर्मगुरूचा बळी गेला. गुरूवार दि. 13 रोजी या धर्मगुरूला कोरोनाचा संसर्ग झाल्याने कोविड हॉस्पिटलात दाखल करण्यात आले होते. मडगावच्या कोविड हॉस्पिटलात आत्ता पर्यंत बळी गेलेल्याची संख्या 67 वर पोचली आहे.
शनिवारी रात्रीच 11.45च्या दरम्यान मडगावच्या मोती डोंगरावरील एका 39 वर्षीय व्यक्तीचा बळी गेला होता. त्यानंतर मध्यरात्री 12.15 वा. घोगळ-मडगाव येथील 66 पुरूषांचा बळी गेला होता. या दोघांना अन्य आजारांची पार्श्वभूमी होती अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
मोती डोंगरावर आत्ता पर्यंत तीन बळी
मडगावच्या मोती डोंगरावर कोरोनाचा संसर्ग झाल्याने आत्ता पर्यंत तिघांचा बळी गेला आहे. त्यात दोन महिला व एक पुरूषाचा समावेश आहे. दोन महिला पैकी एका महिलेला मडगावच्या कोविड हॉस्पिटलात तर दुसरीचा गोमेकॉत बळी गेला होता. तर पुरूषा बळी हा मडगावच्या कोविड हॉस्पिटलात गेला.
अतिदक्षता विभाग पुन्हा भरला
मडगावच्या कोविड हॉस्पिटलचा अतिदक्षता विभाग पुन्हा एकदा भरला आहे. अतिदक्षता विभागात सहा रूग्ण आहेत. तर आयटीयूमध्ये 14 रूग्ण उपचार घेत आहेत. अतिदक्षता विभागातील रूग्णांची प्रकृती नाजूक आहे. काल दिवसभरात 12 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर 184 रूग्ण कोविड हॉस्पिटलात उपचार घेत आहेत.