ऑनलाईन टीम / पुणे :
संवाद पुणे व समर्थ युवा फौंडेशनच्या वतीने पुण्यातील पडद्यामागचे कलाकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी कोविड -19 पासून बचावासाठी सॅनिटायझर, मास्क, ड्रायफ्रुट व आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप बालगंधर्व रंगमंदिर येथे आज करण्यात आले.
यावेळी पडद्यामागील कलाकारांनी आपल्या व कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आव्हान राजेश पांडे यांनी केले. यावेळी संवादचे अध्यक्ष सुनील महाजन, मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, रंगमंचीय कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र गोखले, अरुण जगताप, अरुण पोमण, रणजीत सोनावळे व ४० रंगमंचीय कलाकार उपस्थित होते.