ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनावर प्रभावी ठरलेल्या रेमडेसिवीरचे ‘कोविफोर’ हे पहिले जेनेरिक औषध देशातील पाच राज्यात पोहचले आहे. हेटेरो हेल्थकेअरने यासंदर्भात माहिती दिली आहे.
कोविफोर हे जेनेरिक औषध अमेरिकन कंपनी गिलीड सायन्सेसने तयार केले आहे. भारतातील हेटेलो लॅबला हे औषध तयार करण्याची परवानगी मिळाली आहे. हेटेलोने आतापर्यंत या औषधाच्या 20 हजार बाटल्या तयार केल्या आहेत. त्यामधील 10 हजार बाटल्या महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू आणि हैदराबादला पाठवण्यात आल्या आहेत. तर भोपाळ, लखनऊ, पटना, भुवनेश्वर, रांची विजयवाडा, कोचिन, त्रिवेंद्रम, गोवा, कोलकाता आणि इंदौरमध्ये पुढील आठवड्यात पाठविण्यात येणार आहेत.
कोविफोर औषधाची किंमत 5400 रुपये प्रति बॉटल ठरवण्यात आली आहे. 100 एमजीच्या बॉटलमध्ये हे औषध असेल. इंजेक्शनद्वारे ते रुग्णाला देण्यात येईल. लहान मुलांपासून वृद्ध कोरोनाबधित रुग्णाला हे औषध देण्यात येईल.