ऑनलाईन टीम / चेन्नई :
चेन्नईत ‘कोविशिल्ड’ लसीच्या चाचणीत सहभागी झालेल्या एका 40 वर्षीय व्यक्तीला लसीचे गंभीर दुष्परिणाम दिसून आले. त्याला व्हर्च्युअल न्यूरॉलॉजिकल ब्रेकडाऊनसारख्या समस्येचाही सामना करावा लागला. त्यामुळे त्याने 5 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात ट्विट केले आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि फार्मा कंपनी ॲस्ट्राझेनेका यांनी ही लस तयार केली आहे. यापूर्वीच्या चाचणीत ज्यांना लसीचे कमी डोस देण्यात आले, ते 90 टक्के तर ज्यांना दोन पूर्ण डोस देण्यात आले होते ते 62 टक्के प्रभावी असल्याचे आढळून आले. त्यानंतर या लसीच्या परिणामकारकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.