प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोवीड -1 9 साथीचे रुग्ण राज्यातील सर्वच जिल्हयांमध्ये आढळून आले आहेत . या रुग्णांच्या संख्येमध्ये सतत वाढ होत आहे . कोवीड चाचण्यांसाठी साठी आयसीएमआर ने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत . या सूचना तसेच राज्यातील रुग्णांचे स्वरुप लक्षात घेऊन राज्याच्या कोवीड -1 9 चाचण्यांचे अल्गोरिदम तयार करण्यात आले आहेत. याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी एक परिपत्रक जारी केले असून यामुळे कोविड चाचणी पद्धत निश्चित करण्यात आली आहे.
या अल्गोरिदम मध्ये कोवीड -1 9 चाचण्या करण्यासाठी आवश्यक असणा – या व्यक्तीची विभागणी तीन गटामध्ये करण्यात आली आहे व प्रत्येक गटासाठीचा चाचणीचा प्रकार त्याअंतर्गत नमुद केला आहे . त्यानुसार ज्या व्यक्तींना उपचारासाठी त्वरीत चाचणी करणे आवश्यक आहे अशांची अँटीजेन चाचणी करण्यात यावी . यामुळे अशा रुग्णांच्या उपचाराबाबत अर्ध्या तासांत निर्णय घेता येणे शक्य होईल . तसेच Rऊझ्ण्R चाचणी ही अँटिजेन चाचणी नकारात्मक आलेले व लक्षणे असणारे रुग्ण , पॉझिटिव्ह व्यक्तींचे हाय रिस्क कॉन्टॅक्ट आणि परदेशांतून येणा – या व्यक्ती यांची करण्यात यावी. ँrदल्gप्t dाad व्यक्ती , बाळतपणासाठी आलेल्या माता , गंभीर ऑपरेशन रुग्ण इ . व्यक्तींची ऊrल हू चाचणी करण्यात यावी. ज्या ठिकाणी ऊrल हू सुविधा उपलब्ध नाही अशा ठिकाणी या व्यक्तींची अँटिजेन चाचणी करण्यात यावी , मनोरुग्णालयात दाखल होणा – या रुग्णांना प्रथम 1 आठवडा क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात यावे , त्यानंतर अँटिजेन चाचणी करावी आणि त्यानुसार विलगिकरण किंवा रुग्णालयातील संबंधीत वॉर्डमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात यावा . तुरुंगाबाबत सुध्दा कैदी दाखल झाल्यानंतर 1 आठवडा क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात यावे , त्यानंतर अंटीजेन चाचणी करावी . चाचणीच्या निष्कर्षानुसार विलगिकरण, कोवीड रुग्णालया संदर्भात करणे इ . याबाबत निर्णय घेण्यात यावा . ब – याच जिल्हयांमध्ये एकाच रुग्णांच्या 2-3 चाचण्या करण्यात येतात . यामुळे चाचण्यांवरील ताण वाढतो आणि शासनाचा आर्थिक भार सुध्दा वाढतो . त्यामुळे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रत्येक व्यक्तींची प्रोटोकॉल नुसारच चाचणी करावी , अधिकच्या चाचण्या करु नयेत . प्रवास करणा – या व्यक्ती , जिल्हयात दाखल होणा – या व्यक्ती , व्यापारी अशांची त्यांना कोवीड सदृश्य लक्षणे नसल्यास कोवीड -1 9 चाचणी करण्यात येवू नये .
या पद्धतीनुसार कार्यवाही करुन जास्तीत जास्त कोवीड पॉझिटिव्ह व्यक्ती शोधल्या जातील यादृष्टीने नियोजन करावे असे आदेश प्रारीत करण्यात आल्या आहेत.