ऑनलाईन टीम / जिन्हेवा :
भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ लसीचे अंतिम टप्प्यातील डेटा चांगले रिझल्ट दाखवत आहे. त्यामुळे या लसीला जागतिक आरोग्य संघटना लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता देऊ शकते, असे WHO च्या प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे.
‘कोवॅक्सिन’ या लसीचा सध्या भारतातच वापर सुरू आहे. या लसीला जागतिक स्तरावर अद्याप मान्यता मिळालेली नाही. मात्र, ही लस जागतिक सुरक्षा मानांकन पूर्ण करताना दिसत आहे. तिसऱ्या टप्प्यातील डेटानुसार कोरोनावर ही लस 77.8 टक्के प्रभावी आहे. तर डेल्टा व्हेरिएंटविरोधात ही लस 65.2 टक्के प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. WHO या सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहे. लवकरच या लसीला WHO मान्यता देऊ शकते.