ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारत बायोटेकची ‘कोवॅक्सिन’ लस कोरोनाच्या डेल्टा प्लस या धोकादायक व्हेरिएंटविरोधात प्रभावी असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) संशोधनातून समोर आली आहे.
‘कोवॅक्सिन’चे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. त्यावर आता एक महत्त्वपूर्ण माहिती पुढे आली आहे. कोवॅक्सिन कोरोनावर 77.8 टक्के तर डेल्टा प्लस या धोकादायक व्हेरिएंट विरोधात 65.2 टक्के प्रभावी असल्याचे ICMR च्या अहवालातून समोर आले आहे.