कोरोनाच्या अस्मानी संकटाशी झुंजणाऱया कोव्हिड योद्धय़ांचा गौरव करण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचे खेळाडू ट्रिब्यूट जर्सीत खेळताना दिसून येतील. प्रत्येक खेळाडूच्या जर्सीमागे कोव्हिड हिरोज असे लिहिलेले असेल. सरावावेळी परिधान केल्या जाणाऱया जर्सीवरही याचा उल्लेख असणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाने एका पत्रकातून ही माहिती
दिली.
सदर जर्सीचे आभासी अनावरण केले गेले, त्यावेळी आरसीबी अध्यक्ष संजीव चौरीवाला, कर्णधार विराट कोहली, पार्थिव पटेल व युवा सलामीवीर देवदत्त पडिक्कल यांनी हजेरी दर्शवली. कोरोनाविरुद्ध लढय़ात जे आघाडीवर लढत आहेत, त्यांच्या कार्याला तोड नाही. त्यामुळे, त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला, असे आरसीबी अध्यक्ष संजीव चौरीवाला यांनी नमूद केले.