पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
प्रतिनिधी / सोलापूर
कोरोनावरील प्रतिबंधात्मक, सिरम इन्स्टिट्यूट मधील कोविशील्डचे 34 हजार लस आज सोलापुरात दाखल होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील 16 केंद्रावर लस देण्याचे नियोजन करण्यात आले असून 16 जानेवारी पासून दररोज शंभर जणांना ही लस देण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेत आज बुधवारी दिली.
सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेनिमित्त अक्षता सोहळ्यासाठी सोलापूर दौऱ्यावर आले होते. दरम्यान आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोणाची आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 34 हजार लस आज सोलापुरात दाखल होणार, 16 जानेवारीपासून लस देण्यास प्रारंभ, दररोज शंभर जणांना दिली जाणार आहे. शहरात चार, ग्रामीण भागात बारा केंद्रावर सोय केल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.