ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, अजून त्याला म्हणावं तसं यश मिळत नाही आहे. या पार्शवभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारला ‘को एक्झिस्टिंग विथ कोरोना’ ची योजना आखण्याचा सल्ला दिला आहे.
लॉक डाऊन दीर्घकाळ चालू ठेवणे आपल्या अर्थव्यवस्थेला, उद्योगांना, कामगारांना आणि सामान्य जनतेला परवडणारे नाही आहे. त्यामुळे आपण टीबी, मलेरिया, एच -1 एन-1 अश्या आजारासह दैनंदिन आयुष्य जगतोय त्याच धर्तीवर ‘को एक्झिस्टिंग विथ कोरोना’ असा प्लॅन तयार करावा अशी सूचना शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पथका समवेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत केली आहे.
या बैठकीत अमोल कोल्हे यांनी अतिशय अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले. यावेळी त्यांनी ग्रीन झोन मध्ये सर्वप्रथम ‘को एक्झिस्टिंग विथ कोरोना’ ची अंमलबजावणी केली पाहिजे असे सुचवले. तसेच त्यानंतर ऑरेंज आणि रेड झोन मध्ये सुरुवात करू शकतो असेही ते म्हणाले. तसचं मास्क टेस्टिंग ही गरजेचे आहे असे सांगत कोल्हे यांनी मास्क टेस्टिंग मागणी केली.
त्याचबरोबर वैद्यकीय उपचार करणाऱ्या स्टाफची इंटरव्हलला व्यवस्थित तपासणी केली जावी. असे ही अमोल कोल्हे यांनी यावेळी सुचविले.