विरभद्रनगर येथील घटना
प्रतिनिधी \ बेळगाव
कौटुंबिक वादातून गदग येथील एका महिलेवर लोखंडी रॉड व चाकुने हल्ला करण्यात आला आहे. विरभद्रनगर येथे मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.
सुसव्वा बसनगौडा कलकेरी (वय 54, रा. गदग) असे तीचे नाव आहे. सुसव्वा आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी मंगळवारी बेळगावात आली आहे. तिच्या बहिणीचे कौटुंबिक वाद सुरु होते. या वादात बहिणीच्या बाजुने जाब विचारल्याने तिच्यावर हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या संबंधी बुधवारी सायंकाळी मार्केट पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता अद्याप एफआयआर दाखल झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सुसव्वाची बहिण बेळगावात असते. तिचा पती बरोबर वाद सुरु आहे. या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.